
सांगली : सरत्या वर्षातील सर्वांत मोठी शैक्षणिक घडामोड म्हणजे, वैद्यकीय प्रवेशासाठीच्या नीट परीक्षेतील गोंधळ लवकर संपला नाही. परिणामी, यावर्षी वैद्यकीय प्रवेशाला विलंब झाला. प्राथमिक शिक्षण क्षेत्रात राज्य सरकारच्या गणवेश केंद्रीकरण धोरणाचा मोठा फटका बसला आणि मुलांना एकाच गणवेशावर जवळपास सात-आठ महिने काढावे लागले.