... आणि रूग्णालयात माणुसकी गहिवरली ! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जानेवारी 2020

इचलकरंजी  येथील तारदाळ परिसरातील संगमनगर भागात निराधारपणे फिरणाऱ्या वृध्द व्यक्तीस सामाजिक कार्यकर्त्यांनी शासनाच्या आयजीएम रूग्णालयात आणले. रूग्णालयात आणताच 72 वर्षाची ही व्यक्ती इंग्लिशमधून बोलू लागली. त्याचवेळी त्या ठिकाणी काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने साहेब तुम्ही... असे शब्द उच्चारले आणि सगळेच गहिवरून गेले. ज्या रूग्णालयात 16 वर्षे वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केले त्याच व्यक्तीस निराधार म्हणून रूग्णालयात यावे लागले हे पाहून अनेकजण निशब्दच झाले.

इचलकरंजी (कोल्हापूर) : येथील तारदाळ परिसरातील संगमनगर भागात निराधारपणे फिरणाऱ्या वृध्द व्यक्तीस सामाजिक कार्यकर्त्यांनी शासनाच्या आयजीएम रूग्णालयात आणले. रूग्णालयात आणताच 72 वर्षाची ही व्यक्ती इंग्लिशमधून बोलू लागली. त्याचवेळी त्या ठिकाणी काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने साहेब तुम्ही... असे शब्द उच्चारले आणि सगळेच गहिवरून गेले. ज्या रूग्णालयात 16 वर्षे वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केले त्याच व्यक्तीस निराधार म्हणून रूग्णालयात यावे लागले हे पाहून अनेकजण निशब्दच झाले. 

हे पण वाचा - चोरी केली कोल्हापुरात आणि अटक..

येथील माणूसकी फौंडेशनच्या आकाश नरूटे आणि अन्य सदस्यांनी आज या ज्येष्ठ व्यक्तीस दिलेला आधार लाखमोलाचा ठरला. त्यांच्या सोबत काम करणारे आयजीएम रूग्णालयातील वॉर्डबॉय पोपट याला आपल्या वरिष्ठांची ही अवस्था पाहून अश्रू अनावर झाले. तारदाळ संगमनगर भागात एक वृध्द व्यक्ती निराधार होऊन फिरताना आढळली. अशक्त बनलेल्या या व्यक्तीस तपासणीसाठी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आयजीएम रूग्णालयात आणले. रूग्णालयात येताच या व्यक्तीने इंग्रजीमधून संभाषण सुरू केले. अधिक चौकशी करता ही व्यक्ती याच रूग्णालयातील निवृत्त वैद्यकीय अधिकारी असल्याचे आढळून आले. दरम्यानच्या काळात त्यांच्यासोबत काम करणारा पोपट या कर्मचाऱ्याने आपल्या वरिष्ठांची ही अवस्था पाहून गहिवरून आले. पोपट याने वैद्यकीय अधिकारी असलेले ही व्यक्ती याच रूग्णालयात 16 वर्षे काम केल्याचे सांगितले. घरातील अनेकजण उच्चपदस्थ असतानाही या व्यक्तीची ही अवस्था का झाली याबाबत मात्र अनेकांना कोडेच पडले. परंतू फारशी त्या गोष्टीला महत्व न देता संबंधित अधिकाऱ्यावर योग्य उपचार करण्यासाठी माणूसकी फौंडेशनच्या कार्यकर्त्यांची मदत लाख मोलाची ठरली. 

हे पण वाचा - महापूर झेलूनही राज्यात कोल्हापूरच भारी

फौंडेशनचे रवी जावळे, प्रविण केर्ले, आकाश नरूटे, अजित पाटील, प्रथमेश इंदुलकर, रणकीत रॉय, अनिकेत बिराडे, कृष्णा इंगळे, अक्षय होगाडे, प्रताप देसाई, ऋतुराज पाटील व इम्रान शेख या कार्यकर्त्यांनी या व्यक्तीच्या पुर्नवसनासाठी धडपड केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: medical officer baseless in kolhapur ichalkaranji