मरकज ते माणिकदौंडी...आता कोरोनाचा डर.. सुरू झाली पळापळ

Merkaj to Manikdondi connection
Merkaj to Manikdondi connection
Updated on

पाथर्डी ः तालुक्‍यातील माणिकदौंडी येथील एक तरुण दिल्लीतील तबलिगींच्या धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित होता, असे सांगितले जात आहे. त्यामुळे तालुका प्रशासनाने संबंधित तरुण आणि त्याच्या कुटुंबातील बारा जणांना ताब्यात घेऊन आज नगर येथे तपासणीसाठी पाठविले. 
एक ज्येष्ठ नागरिक खोकल्याचा त्रास होत असल्याने गुरुवारी माणिकदौंडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात आला होता.

वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय जायभाये यांनी उपचार करताना अधिक माहिती घेतली असता, मुंबई येथून एक जण आल्याचे समजले. त्यावरूनच शुक्रवारी पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे, नायब तहसीलदार पंकज नेवसे यांनी महसूल, पोलिस व आरोग्य कर्मचाऱ्यांसह माणिकदौंडी येथे जाऊन कसून चौकशी केली. माणिकदौंडीचा एक तरुण मुंबई येथे व्यवसायानिमित्त राहतो.

तो मुंबईहून दिल्लीच्या तबलिगींच्या धार्मिक कार्यक्रमाला गेला होता. 13 मार्च रोजी तो मुंबईत आल्याचे सांगतो. तेथून तो 26 मार्च रोजी माणिकदौंडी येथे आला. या युवकाचे कुटुंब गावाच्या बाहेर राहते. त्याचे वडील व भावाला खोकला येत असल्याचे समजते. या युवकासह त्याच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील बारा जणांना शुक्रवारी ताब्यात घेऊन नगर येथे जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. या घटनेमुळे माणिकदौंडी परिसरात खळबळ उडाली आहे. 

संबंधित युवकाची माहिती घेत आहोत. वैद्यकीय तपासणीनंतरच अधिक चौकशी करू. युवक दिल्लीला गेला होता का, याचा तपास करावा लागेल. निश्‍चित सांगता येणार नाही. 
- रमेश रत्नपारखी, पोलिस निरीक्षक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Why is kharif sowing delayed in Sangli?
Sangli Satara MLC election result 2026
Investigation Update: Mhamdya Nadaf’s Role in the Murder Conspiracy
Infrastructure Milestone: Trial Run on the 3.47km Karad Flyover
Marathi News Esakal
www.esakal.com