सुटीला येणाऱ्या पाहुण्यांना गेला निरोप "औंदा फिरकू नका' 

corona logo.jpg
corona logo.jpg

कुरळप सांगली)- मे महिन्याच्या सुटीत शहरी पाहुण्यांचे डोळे गावातल्या पाहुण्यांकडे लागलेले असतात. यंदा मात्र त्यांनी इकडे फिरकू नये अशी गावांची मानसिकता झाली आहे. "अतिथी देवो भव'च्या ऐवजी "अतिथी न येवो भव' अशी नवी म्हण तयारी झाली आहे. 


परिक्षा संपल्या, मे ची चाहून लागली की सर्वजण सुट्टी सुरू होण्याची वाट पाहत असत. नोकरी, व्यवसाय, उच्च शिक्षण व इतर कामांसाठी शहराची वाट धरलेले मे च्या सुटीत गावाच्या ओढीने घरचा रस्ता धरतात. गावात राहणारे त्यांचे भाऊ, बहीण, आत्या, मावशी, मावस बहीण व अन्य नातेवाईकांना भेटण्याचीही त्यांची ओढ असते. मे चा परिक्षा निकालांचा पहिला आठवडा संपला की उर्वरित दिवस म्हणजे दहा जून पर्यंत जवळपास महिनाभर गावाकडे मोकळ्या वातावरणात येऊन ताण कमी करराचा बेत आखला जात असे. मुलांसाठी हे दिवस म्हणजे मौजमजा, खेळणे, बागडणे यासह भरगच्च कार्यक्रमांचा कालावधी.

यंदा मात्र सुटी लॉकडाऊनमुळे कोंडवाड्यात गेली. गावाकडच्या लोकांनी तर शहरात निरोपही धोडले. आहे तिथं थांबा. औंदा गावाकडे येऊचनका. य निरोपामुळे गावातल्या आणि त्यांचे समवयस्क असलेल्या शहरातल्या चिमुकल्यांचे चेहरे हिरमुसले. शहरात राहणारी मुले लवकरात लवकर गावाकडे घेऊ चला असा हट्ट करीत आहेत. तर गावातल्या मुलांचेही डोळे त्यांच्या वाटेकडे लागले आहेत. तीन मे रोजी लॉकडाउन संपेल अशी अपेक्षा होती. मात्र कोरोनाचा वाढता प्रसार पाहन लॉकडाऊनही वाढवण्यात आला आहे.

नव्या वेळापत्रकानुसार तो 17 मे पर्यंत असेल. त्यामुळे चिमुकल्यांच्या आनंदावर विरजण पडले. पुणे, मुंबईच्या नागरिकांना ग्रामीण भागात जाण्यास अटींची पूर्तता करण्याची अट घातली आहे. शहरातला कोरोनाचा वाढणारा प्रभाव पाहून गावाकडे यावे असे मनोमन वाटत असले तरी आपल्यासह गावकऱ्यांच्या आरोग्यासाठी त्यांनी गावाकडे येणे टाळावेच, अशी अपेक्षा गावात राहणारे कठोर मनाने व्यक्त करीत आहेत. 

शिस्त पाळली पण... 

मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून ग्रामीण भागाने स्वयंशिस्त पाळली आहे. गावे बंद करणे, जमाव न करणे, यात्रा, जत्रांसह कार्यक्रम रद्द करणे, गर्दी न करणे आदी नियम पाळले गेले. आता मात्र त्यांना चिंता लागली आहे ती आपल्याच लोकांशी दोन हात कसे करायचे? 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com