"पाणी वाचवा'चा संदेश केवळ जनतेसाठी

The message "Save water" is for the public only
The message "Save water" is for the public only

नगर : दुष्काळामुळे जिल्ह्यात तीन वर्षे जनतेला पाण्यासाठी भटकंती करावी लागली. त्यामुळे आता पाण्याचे महत्त्व पटले आहे. दुष्काळाची झळ सहन केलेल्या गावांमधून आता पाणी जपून वापरण्यास सुरवात झाली आहे. मात्र, "पाणी वाचवा'चा संदेश देणाऱ्या जिल्हा परिषदेकडूनच पाण्याचा अपव्यय होत आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून हा प्रकार होत आहे.त्याकडे कोणाचे लक्ष नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.


जिल्ह्यात तीन वर्षे दुष्काळ असल्यामुळे पिण्याचे पाणी व जनावरांना चारा उपलब्ध नव्हता. नागरिकांना पिण्यासाठी पाण्याची सोय टॅंकरद्वारे करण्यात आली होती; मात्र ते नागरिकांना अपुरे पडत असल्याने नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरू होती. दुष्काळामुळे नागरिकांना पाण्याचे महत्त्व कळले आहे. जिल्हा टॅंकरमुक्त करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी जिल्ह्यात जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर होत आहेत. "पाणी अडवा, पाणी जिरवा'चा संदेश दिला जात आहे. विविध सामाजिक संस्था जलसंधारणाची कामे करीत आहेत. लोकही त्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.
जिल्हा परिषदेकडून पाणी वाचविण्याचा संदेश ग्रामीण भागाला दिला जात आहे. त्यासाठी बोधवाक्‍य तयार करून त्याने भिंती रंगविल्या आहेत. जनतेला पाणी वाचविण्याचा संदेश दिला जात आहे. मात्र, या संदेशाचा विसर जिल्हा परिषदेला पडला असल्याचे सध्या तरी जिल्हा परिषदेतील स्वच्छतागृहातील परिस्थितीवरून दिसून येत आहे.

जिल्हा परिषदेतील स्वच्छतागृहाच्या बेसिनमधील नळ नादुरुस्त झाल्याने त्यातून पाणी कायम वाहते.पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती झालेली आहे. तेथे येणारे कर्मचारी त्या पाण्याने हात धुतात. मात्र, वाहणाऱ्या या पाण्याकडे ते दुर्लक्ष करतात. संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारीही या ठिकाणी येतात ; परंतु आपणास त्याचे काही देणे-घेणे नाही अशा पद्धतीने त्याकडे पाहून तेथून काढता पाय घेतात.

या प्रकरणी दोषींवर मुख्य कार्यकारी अधिकारी कारवाई करणार का? असा सवाल आता उपस्थित होत आहे. हा नळ तातडीने दुरूस्त करण्याची व पाण्याची गळती थांबविण्याची आवश्‍यकता आहे. जिल्हा परिषदेच्या इमारतीतील सर्व नळांची पाहणी करण्याची व आवश्‍यक तेथे दुरूस्ती करण्याची गरज आहे.


माहिती असून सगळेच गप्प

स्वच्छता गृहातील नळ तुटलेला आहे, याची माहिती पोटमजल्यावरील विभागांतील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना होती. मात्र, तो नळ दुरुस्त करावा, याबाबत कोणीच संबंधित विभागाला सूचना केली नाही. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पाण्याचा मोठा अपव्यय होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com