Coronavirus : मुस्लिम समाजाचा संदेश; सर्वांपर्यंत सूचना पाठविण्याचे आवाहन

Coronavirus : मुस्लिम समाजाचा संदेश; सर्वांपर्यंत सूचना पाठविण्याचे आवाहन
Updated on

कऱ्हाड ः शहरात शुक्रवारीच्या सार्वजनिक नमाज अदा केल्या जाणार नाहीत, असा निर्णय मुस्लिम समाजाने घेतला आहे. नमाज अदा करण्यासाठी होणारी गर्दीही टाळावी, असे आवाहन केले आहे. प्रत्येकाने शुक्रवारची नमाज आपल्या घरात अदा करावी, असेही आवाहन केले आहे.
 
कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यास शासन उपाय राबवत आहे. मुस्लिम समाजातील मशिदीमध्ये शुक्रवारीच्या नमाजला गर्दी होत असते. त्यामुळे प्रादुर्भाव होऊ शकतो. तो रोखण्यासाठी काय पर्याय करू शकतो यावर कऱ्हाड शहर मुस्लिम समाजाचे जबाबदार व शहरातील सर्व उलेमा कमेटी तबलिगी जमात जिम्मेदार व सुन्नी जमात यांची सयुक्तिक बैठक झाली.

त्यात शुक्रवारी होणाऱ्या नमाजाचे नियोजन कमीतकमी लोकांमध्ये मशिदीत नमाज अदा करण्याचे ठरले. बाकीचे लोक घरीच नमाज अदा करतील व लहान मुले मशिदीत आणण्यास मनाई करण्यात आली आहे. मदरसा व मक्तबला असणाऱ्यांनी व्यक्तींनी मशिदीत येणे टाळावे, अशी सूचना देण्यात आली आहे. मशिदीजवळ सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. मुस्लिम समाजातील सर्व जबाबदार नागरिक व उलेमा समितीचे सदस्य उपस्थित होते. यापुढे शासनाकडून जे निर्देश येतील त्याचे काटेकोरपणे पालन करण्याचे मुस्लिम समाजाने मान्य केले आहे. त्या आशयाच्या सूचना सर्व तालुक्‍यांतील मुस्लिम समाजाला देण्याचे नियोजन केले आहे. 

सर्व प्रार्थनास्थळांच्या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम करण्यास व पाचपेक्षा अधिक जणांना एकत्र येण्यास प्रतिबंध,  जिल्हाधिकारी यांनी दिले आदेश

सातारा :  सातारा पोलीस अधिक्षक यांनी कळविल्यानुसार सातारा जिल्ह्यात  ब-याचशा ठिकाणी प्रार्थना स्थळी बहुतांश जनसमुदाय एकत्र येऊन धार्मिक कार्यक्रम अथवा प्रार्थना करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब विषाणू संसर्गासाठी पोषक आहे.  यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणूनव कोरोना विषाणुचा संसर्ग होऊ नये यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलमानुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन सातारा जिल्ह्यातील सातारा जिल्हयातील सर्व मंदीर, मस्जीद, गुरुद्वारा, गिरीजाघर, बौध्द विहार व इतर धार्मिक व प्रार्थना स्थळाच्या ठिकाणी एका वेळी पाच पेक्षा अधिक पुजारी, भाविक एकत्र जमण्यास दि. 31 मार्च 2020 पर्यंत प्रतिबंध करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.

सातारा : खासदार उदयनराजेंनी केला मानाचा मुजरा

या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ग्रामीण भागासाठी संबंधीत ग्रामसेवक, पोलीस पाटील व बिट अंमलदार व त्या कार्यक्षेत्रातील पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी तसेच शहरी भागासाठी बिट अंमलदार, त्या कार्यक्षेत्रातील पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व स्थानिक स्वराज्य संस्थेची राहील. संबंधीत अधिकारी कर्मचारी यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील तरतूदीनसार संबंधितांवर कारवाई करावी. तसेच कर्तव्यात कसूर करणा-या संबंधितांवरही आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील तरतूदीनसार कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येईल असे आदेशात नमुद आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com