Heat Wave in Belgaum : पुढील पाच दिवस बेळगावसह 18 जिल्ह्यांत उष्णतेची तीव्र लाट येणार; हवामान विभागाचा इशारा

मॉन्सूनपूर्व (Monsoon) पाऊस लांबल्यामुळे उष्णतेची लाट वाढत आहे.
Heat Wave in Belgaum
Heat Wave in Belgaum esakal
Summary

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार एक मेपासून दक्षिणेकडील भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. परंतु, त्याचा परिणाम उष्‍म्‍यावरच होणार आहे.

बेळगाव : बेळगावसह (Belgaum Temperature) राज्यातील अठरा जिल्ह्यांत पुढील पाच दिवस उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने (Meteorology Department) दिला आहे. मॉन्सूनपूर्व (Monsoon) पाऊस लांबल्यामुळे उष्णतेची लाट वाढत आहे. परिणामी, तापमानामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविली आहे. हवेतील आर्द्रता प्रमाण वाढून उष्ण वारे वाहणार असल्याचेही सांगितले. सामान्यपणे एप्रिलअखेर अवकाळी वळीव पावसाची शक्यता असते. यंदा काही भागात तुरळक पाऊस पडला. ११ मेनंतर पावसाची शक्यता आहे. तेव्हा पाऊस झाल्यास शेतीला पोषक वातावरण ठरणार आहे.

Heat Wave in Belgaum
काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी शरद पवार निपाणीत; म्हणाले, 'मोदींची हुकूमशाही किती दिवस सहन करणार'

कल्याण कर्नाटकात किमान तापमान हे २२ ते २३ अंश राहील, असे म्हटले आहे. मात्र, कमाल तापमान हे ४२ अंशांच्या वर जाण्याची शक्यता आहे. कमाल, किमान तापमानात वाढ झाल्यामुळे उष्ण हवेच्‍या प्रमाणात वाढ होणार आहे. एक मेपासून राज्यात दक्षिण भागात मॉन्सूनपूर्व पाऊस होणार नाही. दरवर्षी मार्चपासून मॉन्सूनपूर्व पाऊस पडतो.

मात्र, यावेळी काही जिल्ह्यांत दोन-तीन दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस वगळता पुन्हा पाऊस झाला नाही. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार एक मेपासून दक्षिणेकडील भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. परंतु, त्याचा परिणाम उष्‍म्‍यावरच होणार आहे. तापमान वाढणार आहे. यामुळे बेळगावसह १८ जिल्ह्यांत उष्ण वाऱ्याचा इशारा हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.

Heat Wave in Belgaum
Prajwal Revanna : 'प्रज्वल' प्रकरणामुळे प्रचाराची दिशाच बदलली; काँग्रेस आक्रमक, JDS ऐवजी भाजप नेते रडारवर

जिल्ह्यात तापमान वाढणार

हवमान खात्याकडून राज्यातील १८ जिल्ह्यांत तापमान वाढीचे संकेत वर्तविले आहेत. यात बेळगावसह बिदर, गुलबर्गा, विजापूर, यादगिरी, रायचूर, बागलकोट, गदग, हावेरी, कोप्पळ, बळ्ळारी, विजयनगर, दावणगेरे, चित्रदुर्ग, मंड्या, तुमकूर, कोलार आणि चिक्कबळ्ळापूर जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यात पाच मेपर्यंत उष्णतेची लाट असणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com