
इस्लामपूर : ग्रामीण भागात तळागाळातील महिलांना विविध उद्योग-व्यवसाय उभारून स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रयत्न केल्याची उदाहरणे देणाऱ्या मायक्रोफायनान्स कंपन्यांची वास्तवात गंगा उलटी वाहताना दिसत आहे. अपवादात्मक बचत गट किंवा महिला वगळता कंपन्यांच्या कर्जाचे व्याज व विविध चार्जेसमुळे विकासाऐवजी कर्जाच्या चक्रात अडकलेल्यांची संख्या अधिक आहे.