
नगर ः ""लॉकडाऊनमध्ये उद्योग धंद्यांना चालना मिळण्यासाठी सरकारने परवानगी दिली. त्यामुळे एमआयडीसीतील मोठ्या उद्योजकांनी पुढाकार घेतला. बसेसचे युद्धपातळीवर नियोजन केले. कामगारांचीही मानसिकता बदलून उद्या (सोमवार) त्यांना कामावर सज्ज राहण्यासाठी सूचना दिल्या. त्यानुसार एमआयडीसीतील मोठे उद्योग ट्रायलबेसवर सुरू होणार आहे. हे काम पुढील सहा दिवस चालणार आहे. त्यात क्रॉम्टन, सीमलेस, एल अँड टीचा समावेश राहील, अशी माहिती "एल अँड टी'चे सरव्यवस्थापक अरविंद पारगावकर यांनी दिली.
पारगावकर म्हणाले ""एल अँड टी कंपनीचे सध्या दोन युनिट ट्रायलबेसवर सुरू होतील. त्यासाठी दोन बसेसचे नियोजन केले आहे. प्रशासनाने सांगितलेल्या खबरदारीच्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीनुसार सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून एका बसमधून 15 ते 20 लोकांना कंपनीत आणले जाईल. त्यांना झेड पद्धतीने बसवून सहा फुटांचे अंतर ठेवले जाईल, संपूर्ण दक्षता घेतली जाणार आहे. उद्योग सुरू करण्यासंदर्भात प्रशासनाने परवानगी दिल्याने मशिन मेंटेनन्सची कामे सुरू झाली आहेत. त्यात इलेक्ट्रिक सप्लाय, ऑयलिंग, पाण्याच्या टाक्या साफ करणे आदी कामे केली जातील.
बहुतांश कंपन्यांनी घेतली आॅनलाईन परवानगी
जिल्ह्यात बहुतांश कंपन्यांनी उद्योग सुरू करण्यासंदर्भात ऑनलाइन परवानगी घेतली आहे. एमआयडीसीतील काही लघू उद्योजकांनी कामे सुरू केली आहेत. एमआयडीसीत साधारणतः दहा हजार कर्मचारी काम करीत आहेत. "एल अँड टी'मध्ये एक हजार 500 कर्मचारी काम करतात. मात्र, सुरवातीला काही कामगारांना आणून सुरवात करण्यात येईल.
रोजगारामुळे अर्थचक्राची गाडी रुळावर
पारगावकर म्हणाले, ""बसचे एका दिवसाचे भाडे सहा हजार रूपये आहे. त्यामुळे प्रशासनाने कंपनीच्या कामगारांना वैयक्तिक पास देऊन मोटारसायकलला परवानगी द्यावी, यासाठी प्रशासनाला वारंवार विनंती केली जात आहे. एमआयडीसीतील अधिकारीही प्रशासनाशी चर्चा करीत आहे. रोजगार सुरू झाले, तर अर्थचक्राची गाडी रुळावर येणार आहे, अन्यथा कामगार देशोधडीला लागतील. त्यामुळे सरकार प्रशासनाने सर्व बाबींचा विचार करावा. कामगारांना मोटारसायकलला परवानगी दिली, तर मोठ्या प्रमाणात उद्योग सुरू होण्यास मदत होईल. प्रशासन सकारात्मक विचार करेल, अशी अपेक्षा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.