esakal | पोलिसांशी वाद घालाल तर मिळेल काठीचा प्रसाद...
sakal

बोलून बातमी शोधा

mild sticks in sangli food market sangli marathi news

जगभर धुमाकूळ घातलेल्या कोरोनाचे रुग्ण सांगलीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. संचारबंदी लागू केल्यानंतर पोलिसांनी चौकाचौकात बंदोबस्त तैनात केला. नागरीक अजूनही रस्त्यावर फिरत असल्याचे दिसते आहे.

पोलिसांशी वाद घालाल तर मिळेल काठीचा प्रसाद...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली : येथील भाजी मंडईत विक्रेत्यांना सकाळी भाजी विकण्यास आल्यानंतर मोठी गर्दी झाली. त्यावेळी गर्दी आवाक्‍याबाहेर जाण्याची चिन्हे दिसताच पोलिस बळाचा वापर करीत भाजी विक्रेत्यांना हुसकावून लावले. पोलिसांनी नागरीकांना विनंती करीत गर्दी कमी करण्याचे आवाहन केले. आदेश धुडकावणाऱ्या नाठाळांना पोलिसांच्या लाठीचा प्रसाद खावा लागला. परिसरात काही काळ गोंधळ निर्माण झाला. 

जगभर धुमाकूळ घातलेल्या कोरोनाचे रुग्ण सांगलीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. संचारबंदी लागू केल्यानंतर पोलिसांनी चौकाचौकात बंदोबस्त तैनात केला. नागरीक अजूनही रस्त्यावर फिरत असल्याचे दिसते आहे. त्यामुळे पोलिसांनी चौकाचौकात विनाकरण फिरणाऱ्यांना चांगला प्रसाद द्यायला सुरूवात केली आहे. सार्वजनिक ठिकाणी फिरणे अथवा एकत्र येण्यास सक्त मनाई करण्यात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या कडक उपाययोजनांत प्रामुख्याने गर्दी हटवण्यासह अनावश्‍यक फिरण्यावर बंदी घालण्यात आली.

हेही वाचा- Coronaviras : घाबरु नका ; कोल्हापूरात १९६ जणांचा अहवाल ‘निगेटिव्ह...

उपद्रवींनाही काठीचा प्रसाद​

पोलिसांकडून वारंवार सूचना, आवाहन करण्यात येत आहे. येथील बाजारात भाजीविक्रेत्यांनीही बाजार मांडला. त्याची माहिती मिळताच नागरीकांनीही गर्दी केली. गर्दी वाढल्याने पोलिसांना आवरणे कठीण झाले. त्यानंतर पोलिसांनी भाजी विक्रेत्यांनी पोलिसांशी वाद घालायला सुरुवात करताच पोलिसांनी त्यांना फटके देऊन बाजारातून हाकलून लावले. नंतर गर्दी केलेल्या सामान्यांमधील पोलिसांशी वाद घालणाऱ्या उपद्रवींनाही काठीचा प्रसाद देऊन पांगवले. 

 हेही वाचा-निराधारांसाठी धावला वर्दीतील माणूस...

'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या कडक उपाययोजनात प्रामुख्याने गर्दी हलवण्यास अनावश्‍यक फिरण्यावर बंदी आहे. लोकांनी प्रशासनास सहकार्य करावे. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.'' 

- अजय सिंदकर, पोलीस निरीक्षक