गरिबांची बाजरी बनतेय दर्जेदार हिरवळीचं खत!

बाजरीचे क्षेत्र घटले; भविष्यात दरवाढीचे संकेत
बाजरी पीक
बाजरी पीकesakal

सांगली : गरिबांचे धान्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाजरी पिकाचे क्षेत्र दिवसेंदिवस घटत आहे. यंदा बाजरीचा पेरा निम्म्यावर आल्यामुळे नजीकच्या काळात दरवाढीचे संकेत मिळत आहेत. धान्य असणारी बाजरी आज हिरवळीच्या खतासाठी मोठ्या प्रमाणात वापरली जात असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यातील आटपाडी, कवठेमहांकाळ, जत तालुक्यात प्रामुख्याने बाजरीचे क्षेत्र पूर्वापार आहे. दुष्काळी भागात कमी पाऊस-पाण्यावर, कमी श्रमात येणारे हे धान्य पीक आपल्या अनेक गुण वैशिष्ट्यांनी प्रसिद्ध आहे. कालांतराने दुष्काळी टापूत पाण्याच्या उपलब्धतेने कोरडवाहू बाजरी कमी होत गेली. परिणामी क्षेत्रही कमी झाले.

दरवर्षी या पिकाखालील क्षेत्र घटत असल्याचे आकडेवारी सांगते. यंदा निम्म्यापर्यंत पेरणी क्षेत्र घटले आहे. गेल्या काही वर्षांत पावसाळा अनियमित असल्याने बाजरी पीक शेतकऱ्यांसाठी दुय्यम ठरत आहे. जादा उत्पादन देणाऱ्या पिकांकडे शेतकरी वळल्याने पारंपरिक बाजरी दुर्लक्षित होत आहे. दुष्काळी पट्ट्यात बाजरीच्या हुकमी क्षेत्रात सिंचन योजनांचे पाणी खळाळले. त्यामुळे ऊस, द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला यासह बागायती पिकांखालील क्षेत्र वाढत आहे.

बाजरी पीक
'राणेंच्या माध्यमातून आता संपूर्ण कोकणचा कायापालट होणार'

अलीकडच्या काही वर्षांत द्राक्षबागेत हिरवळीचे खत म्हणून बाजरी पेरली जाते. त्यापासून उत्पादन घेण्याऐवजी ठराविक दिवसानंतर ती जमिनीत गाडून खत केले जाते. इतर हिरवळीच्या खतांऐवजी बाजरीपासून निर्माण होणारे खत दर्जेदार होते. शिवाय त्याचा खर्चही अत्यंत कमी असल्याने बागायत शेतकरी त्याला पसंती देत आहेत.

कोरोना काळात महत्त्व वाढले

बाजरीत कर्बोदके, फायबर, प्रथिन, उष्मांक, जीवनसत्व ब, ई, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियमचे प्रमाण मोठ असल्याने कोरोना काळात महत्त्व वाढले आहे. गहू किंवा तांदळापेक्षा यात अधिक ऊर्जा असल्याने जीवनसत्त्वाची कमतरता भरून शरीराला पोषक ठरते. आम्लपित्त, मधुमेह यांसह कोरोना रुग्णांना प्रतिकारशक्ती निर्माण होण्यास मदत होत असल्याचे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे.

बाजरी पीक
'तुला आता ठेवत नाही, ठारच मारतो'; बायकोच्या डोक्यात घातले डंबेल्स

"गेल्या दोन वर्षांत पावसाचे प्रमाण वाढल्याने बागायती पिकाला प्राधान्य दिले. पूर्वी निम्‍या क्षेत्रात बाजरी असायची. यंदा केवळ कुटुंबाला पुरेल एवढेच क्षेत्र पेरले आहे. अनियमित पाऊस, दर्जेदार बियाण्यांची टंचाई यासह कमी उत्पादकतेमुळे बाजरीचे क्षेत्र घटत आहे."

- पोपट पुकळे, शेतकरी, जत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com