गडावरील अतिक्रमणे वन खात्याच्या जमिनीवर झालेली आहेत. ती निघाली पाहिजेत, गडाचे पावित्र्य जतन झाले पाहिजे, यासाठी नितीन शिंदे पाठपुरावा करीत आहेत.
सांगली : ‘किल्ले विशाळगडावर (Fort Vishalgad) वनखात्याच्या जागेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमणे झाली आहेत. या अतिक्रमणांमुळे गडाचे पावित्र्य नष्ट होत असून ही अतिक्रमणे तातडीने काढण्यात यावीत,’ असे आदेश वनमंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी वन विभागाला (Forest Department) दिले.