"एकीकडे संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी सापडतात, मात्र दलितांवर अत्याचार केलेले आरोपी सापडत नाहीत, हा विरोधाभास का याबाबतही फडणवीस यांना विचारणार आहे.’’
सांगली : ‘‘राज्यात दलित अत्याचारांच्या घटना वाढत आहेत. दलितांवर अन्याय-अत्याचार होणाऱ्या प्रकरणात आरोपींवर तातडीने कारवाई झाली पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) असेलेल्या महायुतीच्या सरकारमध्ये दलित (Dalit) असुरक्षित असणे योग्य नाही,’’ अशी खंत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी येथे व्यक्त केली.