esakal | शरद पवार यांनी जे पेरले तेच उगवले
sakal

बोलून बातमी शोधा

शरद पवार यांनी जे पेरले तेच उगवले

सांगली - ``शरद पवार यांनी जे पेरले तेच उगवले. पवारांनी अनेकांचे पक्ष फोडले. राष्ट्रवादी पक्ष त्यांच्याच डोळ्यादेखत आज फुटतोय,'' अशी टीका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे. 

शरद पवार यांनी जे पेरले तेच उगवले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली - ``शरद पवार यांनी जे पेरले तेच उगवले. पवारांनी अनेकांचे पक्ष फोडले. राष्ट्रवादी पक्ष त्यांच्याच डोळ्यादेखत आज फुटतोय,'' अशी टीका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे. 

श्री. खोत म्हणाले, की शरद पवारांनी आतापर्यंत अनेकांचे पक्ष फोडले, मात्र आज त्याचा राष्ट्रवादी पक्ष त्यांच्याच डोळ्यादेखत फुटत आहे. करावं तसं भरावं ही म्हण आपल्याकडे चांगली प्रचलित आहे. जे पवार साहेबांनी पेरलं तेच उगवलं आणि हे चित्र पवाराना पाहण्याचे `भाग्य' देखील लाभले.

शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसला असे आतापर्यंत बोलले जाते. त्यावेळी वसंतदादा पाटील यांना किती दुःख झाले असेल? त्यामुळे आता शरद पवार यांच्या पक्षात जे घडतेय ते फार वेगळे घडतेय असे नाही, असे म्हणत खोत यांनी वसंतदादा-शरद पवार यांच्या वादाची आठवण करून दिली. 

श्री. खोत म्हणाले, सध्या महाराष्ट्रमध्ये विधानसभेच्या निवडणुकीचे वातावरण सुरू झाले आहे. भारतीय जनता पक्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इन्कमिंग सुरू आहे. जे चांगले लोक आहेत आणि ग्रामीण भागाशी नाळ जोडलेली आहे, अशा चांगल्या लोकांना निश्चितपणाने भाजपमध्ये काम करण्याची संधी देण्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली आहे. यामुळेच राष्ट्रवादीतील जी चांगली मंडळी भाजपमध्ये येत आहेत, त्याना मी धन्यवाद देतो, असेही खोत म्हणाले.

loading image
go to top