राज्यमंत्री डॉ. विश्‍वजीत कदम यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह 

घनश्‍याम नवाथे
Friday, 11 September 2020

सांगली- राज्याचे कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्‍वजीत कदम यांचा कोरोना चाचणी अहवाल "पॉझिटीव्ह' आला आहे. त्यांनी फेसबुक "पोस्ट' वरून स्वत:च ही माहिती दिली आहे. तसेच दोन-तीन दिवसात संपर्कात आलेल्या लोकांनी चाचणी करून घ्यावी असे आवाहन केले आहे. 

सांगली- राज्याचे कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्‍वजीत कदम यांचा कोरोना चाचणी अहवाल "पॉझिटीव्ह' आला आहे. त्यांनी फेसबुक "पोस्ट' वरून स्वत:च ही माहिती दिली आहे. तसेच दोन-तीन दिवसात संपर्कात आलेल्या लोकांनी चाचणी करून घ्यावी असे आवाहन केले आहे. 

जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढतच असून 20 हजाराचा टप्पा ओलांडला आहे. राजकीय नेते मंडळी देखील कोरोना बाधित होत आहे. खासदार संजय पाटील यांच्यासह आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, आमदार विक्रमसिंह सावंत, आमदार सुमन पाटील, आमदार अनिल बाबर, आमदार सदाभाऊ खोत, आमदार मोहनराव कदम, आमदार गोपीचंद पडळकर हे यापूर्वी बाधित झाले आहेत. तसेच माजी आमदार संभाजी पवार, माजी आमदार नितीन शिंदे, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांच्यासह कॉंग्रेस नेत्या जयश्री पाटील, पृथ्वीराज पाटील हे देखील बाधित झाले होते. 

दरम्यान राज्यमंत्री डॉ. कदम हे देखील कोरोना बाधित झाले आहेत. त्यांना थोडा ताप आणि अंगदुखी अशी सौम्य लक्षणे दिसू लागली होती. त्यामुळे कालच त्यांनी चाचणी करून घेतली. त्याचा अहवाल आज "पॉझिटीव्ह'आला आहे. डॉ. कदम यांनी फेसबुक पोस्टवरून "कोरोना' बाधित झाल्याची माहिती दिली आहे. मतदार संघातील विविध योजनांचा पाठपुरावा, मंत्रालयातील बैठका तसेच भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने पूरपरिस्थितीचा दौरा, भारती विद्यापीठाचे कामकाज अशा धावपळीत वैद्यकीय खबरदारी घेतली. तरीही कोरोना संसर्ग झाल्याचे डॉ. कदम यांनी "पोस्ट' मध्ये म्हटले आहे. 

डॉ. कदम हे वैद्यकीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घरीच विलगीकरणात उपचार घेत आहेत. तब्येत ठिक असून लवकरच सेवेत रूजू होईन असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर संपर्कातील लोकांना चाचणी करून घ्यावी असे आवाहनही केले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister of State Dr. Vishwajeet Kadam Corona Positive