esakal | सीमावासियांसाठी मंत्र्यांचे काळी फित बांधून काम
sakal

बोलून बातमी शोधा

ministers Worked with tying black ribbons for Belgaum border people

ज कर्नाटकातील मराठी भाषिक सीमावासियांना पाठिंब्यासाठी आणि कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तसेच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी काळी फीत बांधून काम केले. 

सीमावासियांसाठी मंत्र्यांचे काळी फित बांधून काम

sakal_logo
By
बलराज पवार

सांगली : महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्‍नी कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ एक नोव्हेंबर हा दिवस काळा दिवस म्हणून पाळण्यात येतो. आज कर्नाटकातील मराठी भाषिक सीमावासियांना पाठिंब्यासाठी आणि कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तसेच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी काळी फीत बांधून काम केले. 

सीमावासीयांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व मंत्रिमंडळाने काळ्या फिती बांधून निषेध नोंदविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. भाषावार प्रांतरचना करताना बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी आदी मराठी बहुभाषिक भाग एक नोव्हेंबर रोजी अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आला.

या विरोधात मराठी भाषिक दरवर्षी एक नोव्हेंबर रोजी रस्त्यावर उतरुन कर्नाटक सरकारचा निषेध नोंदवत असतात. यंदा एक नोव्हेंबरला कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ महाराष्ट्रातही काळ्या फिती बांधण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसने घेतला होता. त्यानुसार राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सकाळपासूनच हाताला काळी फीत बांधून काम सुरु केले. 

सीमावासियांच्या पाठिशी महाराष्ट्र आहे. न्यायालयात वाद असला तरीही कर्नाटक सरकार मराठी भाषिकांवर अत्याचार करत आहे. याच्या निषेधार्थ आज महाराष्ट्रातील सरकारमधील सर्वजण आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त केला आहे. बेळगावसह कर्नाटकमधील सीमाभाग लवकरच महाराष्ट्रात सामील होईल असा विश्वास जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. 

तासगाव कवठेमहांकाळच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदार सुमन पाटील यांनीही हाताला काळी फीत बांधून कर्नाटकातील मराठी भाषकांना आपला पाठिंबा व्यक्त केला. तसेच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनीही काळ्या फिती बांधून कर्नाटक सरकारचा निषेध केला. 

संपादक : युवराज यादव 

loading image