मिरज : पूरग्रस्त १९ गावांसाठी प्रशासन सज्ज

पावसाळा पूर्वतयारीचा घेतला आढावा
मिरज
मिरज sakal

मिरज: आगामी माॅन्सून पूर्वतयारीच्या अनुषंगाने मिरज पंचायत समिती कार्यालयात प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापन समितीची आढावा बैठक पार पडली. यामध्ये मिरज तालुक्यातील १९ पूरग्रस्त गावात संभाव्य पूरस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांचे स्थलांतर, आरोग्य सुविधा, आकस्मिक दुर्घटना घडल्यास तत्काळ मदत यासह अन्य उपाययोजनांवर चर्चा झाली. या वेळी प्रशासन सज्ज ठेवण्याच्या सूचना प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी दिले आहेत.

सन २०१९ साली आलेल्या महापुरात ब्रम्हनाळ येथील दुर्घटनेनंतर शासनाकडून अशा घटना टाळण्यासाठी तालुकास्तरावरील आरोग्याधिकारी, पोलिस अधिकारी, तहसीलदार, तालुका कृषीअधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत माॅन्सून आढावा बैठक पार पडली.

तालुक्यातील औषध साठा, टीसीएलचे प्रमाण, नळ पाणीपुरवठा बंद झाल्यास पर्यायी व्यवस्था उपलब्ध करणे, गर्भवती माता आणि वयोवृद्ध नागरिकांची यादी करून त्यांचे तत्काळ स्थलांतर करणे, पूरस्थितीत गंभीर इजा झालेल्यांना तत्काळ औषधोपचार करणे, पशुधनावरील वैद्यकीय उपचार सुविधा तयार ठेवणे आदी सेवांची तत्काळ कार्यवाही करत त्या सज्ज ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या वेळी तहसीलदार दगडू कुंभार, गटविकास अधिकारी आप्पासो सरगर, कृषी अधिकारी प्रदिप कदम आदि उपस्थित होते.

सध्या पूरस्थितीचा सामना करण्यासाठी तालुका प्रशासनाकडे दहा यांत्रिक बोटी, आठ लाकडी बोटी, दोन फायबर बोटी अशा वीस बोटी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. तर १ हजार १४६ लाईफ जॅकैट, लाईफ रिंग ७२ आणि पट्टीचे पोहणारे १७६ जलतरंग पट्टूंची टीम सज्ज ठेवण्यात आली अाहेत.

-समीर शिंगटे, प्रांताधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com