
"36-hour record Ganesh Visarjan in Miraj; massive crowd chants ‘Morya’, chaos reported."
Sakal
मिरज: सजवलेली बैलगाडी, फुगडीचा फेर धरणाऱ्या महिला, पारंपरिक वेशभूषेत सहभागी कार्यकर्ते आणि ‘मोरयाऽऽऽ’चा जयघोष करत शनिवारी सकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराज गणेशोत्सव मंडळाच्या ‘श्रीं’ची मिरवणूक निघाली. त्यानंतर १८६ मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीचा ऐतिहासिक सोहळा सलग ३६ तास रंगला. रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास मिरज शहर पोलिस ठाण्याच्या ‘श्रीं’चे विसर्जन करून उत्सवाची सांगता झाली. यंदा मिरवणूक विक्रमी गर्दीमुळे लक्षवेधी ठरली.