
miraj clash sp ghuge
esakal
सकाळ वृत्तसेवा
मिरज, ता. 7 : येथे आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने मिरजेत दोन गटात तुफान राडा झाला. संतप्त जमावाकडून संशयताच्या घरावर तुफान दगडफेक करण्यात आली. यानंतर मिरज शहरात सर्वत्र दुकाने रॅली काढून बंद करण्यात आले. गोंधळ माजवणाऱ्या जमावर पोलिसांनी खाक्या दाखवत जमावाला पांगवले. या घटनेमुळे मिरज शहरात रात्री उशिरा पर्यंत तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे मोठा पोलिस फौज फाटा तैनात करण्यात आला आहे.