

Miraj mob beating incident near police station
esakal
Miraj police station incident : एका सराईत गुंडाच्या गुंडगिरीला कंटाळलेल्या नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी त्याला बेदम चोप दिला. मिरज रेल्वे स्थानक परिसरात आज दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला. मिरज रेल्वे स्थानकासमोरच्या रस्त्यावर हुसेन ऊर्फ गुठल्या या सराईत गुन्हेगाराने विक्रेत्यांसह रेल्वे प्रवाशांना धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला. या गुंडगिरीमुळे संतापलेल्या स्थानिक व्यापारी व नागरिकांनी मिळून त्याला भर रस्त्यात पकडले व त्याची चांगलीच धुलाई केली.