Raju Shetti reaction on Miraj police action
esakal
मिरज : अर्जुनवाड (ता. शिरोळ) येथून मिरजेकडे कारमधून येणाऱ्या म्हमद्या नदाफ याला कृष्णा घाट परिसरात पोलिसांनी दोन पिस्तुले आणि आठ जिवंत काडतुसांसह अटक केली. त्याच्यासोबत असलेला साथीदार मंगेश कांबळे यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईत संशयितांकडून मोटारही जप्त करण्यात आली (Mhamadya Nadaf arrested in Miraj) आहे. बुधवारी झालेल्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली. म्हमद्या साथीदारासह अर्जुनवाड येथून मोटारीमधून मिरजेकडे येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.