मुरादाबाद येथील संशयिताकडून सांगलीत कुरिअरच्या माध्यमातून इंजेक्शन येत असल्याचे तपासात समोर आले. त्यानुसार मुरादाबाद येथे कारवाई करत अटक करण्यात आली.
सांगली : नशिल्या इंजेक्शनप्रकरणी मिरजेतील महात्मा गांधी ठाण्याच्या (Mahatma Gandhi Police Station) पोलिसांनी आता उत्तर प्रदेश कनेक्शन उघड केले आहे. इंजेक्शनचा (Injection) वितरण करणारा मुख्य संशयित इंतजार अली जहीरुद्दीन (वय २५, रा. खलीलपूर, ता. कांठ, जि. मुरादाबाद, उत्तर प्रदेश) असे त्याचे नाव आहे. तो सांगलीसह अन्य जिल्ह्यांत कुरिअरच्या माध्यमातून इंजेक्शन पुरवत असल्याचे तपासात समोर आले आहे.