Vehicle Checking Intensified
sakal
पश्चिम महाराष्ट्र
Miraj Election : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरजेत कडक बंदोबस्त; शहरात येणाऱ्या प्रत्येक वाहनाची झडती
Vehicle Checking Intensified : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरज शहरात आदर्श आचारसंहिता काटेकोरपणे राबविण्यासाठी प्रशासनाची कडक पावले.
मिरज : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. संपूर्ण महापालिका क्षेत्रात निवडणूक प्रक्रियेसाठी कडक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणताही गैरप्रकार घडू नये, तसेच कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिस विभाग आणि प्रशासन संयुक्तपणे काम करत आहे.

