

Property Fraud Probe: Dead Person Allegedly Shown Alive, Five Accused in Miraj
esakal
मिरज : मृत व्यक्ती जिवंत असल्याचे भासवून बनावट हिब्बानामा, प्रतिज्ञापत्र व आधारकार्ड तयार करून मालमत्ता स्वतःच्या नावावर करून घेतल्याप्रकरणी मिरज शहर पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे व शासकीय ओळखपत्रात फेरफार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अस्लम महंमद काझी (वय ४०, गुरुवार पेठ, काझी गल्ली, मिरज) यांनी फिर्याद दिली आहे.