मिरज : मॉन्सूनपूर्व नालेसफाई कागदावरच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नालेसफाई नाही

मिरज : मॉन्सूनपूर्व नालेसफाई कागदावरच

मिरज: यंदा मे महिन्यातील शेवटच्या आठवड्यात मॉन्सूनपूर्व पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवली आहे. मात्र मिरजेतील ओढा सफाईस अद्यापही मुहूर्त मिळालेला नाही. बहुतांश भागातील नाले आणि ओढा सफाईस सुरवात झालेली नाही. महापालिकेकडून मॉन्सूनपूर्व तयारी म्हणून शहरातील टाकळी, मालगाव, बोलवाड रोडवरील ओढा सफाई केली जाते. मात्र मे महिना सुरू होऊन तो संपत आला तरी नालेसफाई कागदावरच आहे.

मालगाव रोड, गाडवे कॉलनी आणि ओम गार्डन परिसर; तसेच बोलवाड रोडलगत महापालिकेची हद्दीत ओढ्याशेजारी लोकवस्ती आहे. मात्र बऱ्याच दिवसांपासून ओढा अस्वच्छ आहे. गतवर्षी या ओढ्याचे पाणी गाडवे चौकापर्यंत आले होते; तर मालगाव, बोलवाड रोडवरील अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. सध्या तरी या ओढ्यात मिरजेतील सांडपाणी सोडले जाते. या ओढ्याच्या दुतर्फा काटेरी झाडे आहेत; तर काही ठिकाणी ओढा मातीने भरलेला आहे. लवकरच ओढा सफाई न केल्यास पुन्हा एकदा मिरज शहरातील कॉलनीमध्ये पाणी शिरण्याचा

धोका मिरजेतील रहिवाशांनी व्यक्त केला आहे. २०१९ आणि २०२१ च्या महापुरात मिरजेतील नाले आणि ओढ्यातून पुराचे पाणी शहरात शिरले होते. यावेळी काही ठिकाणी नालेसफाई न केल्यामुळे प्रचंड प्रमाणात गाळ मिरजेतील वेताळबानगर परिसरातील रस्त्यांवर साचला होता. यामुळे शहरातील वाहतूक विस्कळित झाली होती.

Web Title: Miraj Pre Monsoon Sanitation Paper

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top