Miraj PSI Death : मिरजेतील पीएसआयने कॉल, मेसेजला उत्तर दिलं नाही; नंबर ट्रॅक लावला अन् घटनास्थळी पाहताच, एसपींसह सांगली पोलिसांना बसला धक्का

Miraj police officer : सांगली जिल्ह्यातील मिरजेत पीएसआयचा फोन लागत नसल्याने पोलिसांनी नंबर ट्रॅक केला. घटनास्थळी पोहोचल्यावर घडलेला प्रकार पाहून पोलिसांनाही धक्का बसला.
Miraj police officer death

Miraj police officer death

esakal

Updated on

Miraj PSI : मिरज येथील पोलिस उपअधीक्षक कार्यालयात कार्यरत साहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाचा संशयास्पद मृत्यू झाला. बाळू मुसा डांगे (वय ५५, मूळ आरळा, ता. शिराळा, सध्या कुपवाड फाटा, सांगली) असे त्यांचे नाव आहे. आज दुपारपासून ते कोणाच्या संपर्कात नव्हते. त्यानंतर तानंग फाटा येथे मोटारीत त्यांचा मृतदेह आढळला. त्यांनी आत्महत्या केली की, अन्य कोणत्या कारणाने मृत्यू झाला याबाबत माहिती मिळू शकली नाही. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी भेट देऊन माहिती घेतली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com