Miraj Railway Station
sakal
पश्चिम महाराष्ट्र
Sangli News: मिरज रेल्वे स्थानकावरील कलाकृतींवर संघटनांच्या जाहिराती; सुशोभीकरणावर गंडांतर, प्रवाशांचा संताप!
Miraj Railway Station: रेल्वे प्रशासनाने सुशोभीकरणाच्या मोहिमेअंतर्गत मिरज रेल्वे स्थानकाच्या भिंतींवर अत्यंत आकर्षक आणि कलात्मक तैलचित्रे रंगवून प्रवाशांचे लक्ष वेधले होते. परंतु काही रेल्वे संघटनांच्या जाहिरातींच्या पोस्टर्सनी या सुंदर कलाकृतींवर पांघरूण घातले.
मिरज: मिरज रेल्वे स्थानकाच्या भिंतींवर रेल्वे प्रशासनाने सुशोभीकरणासाठी रेखाटलेली आकर्षक तैलचित्रे आता विद्रुप झाली आहेत. काही रेल्वे संघटनांनी या चित्रांवर जाहिरातींची पोस्टर्स चिकटवल्याने या कलाकृतींचा मूळ सौंदर्यभाव हरवला आहे.

