Death Young Man: मिरजेत रेल्वेखाली सापडून तरुणाचा मृत्यू; रेल्वेत चढत असतानाच हात निसटला
Miraj Railway Accident News: महाराष्ट्र एक्स्प्रेस’ मिरज रेल्वे स्थानकाजवळ आल्यानंतर हनुमान मंदिर पुलाजवळ थांबली होती. याचवेळी त्याला उलटी आल्याने तो रेल्वेतून खाली उतरला होता. यानंतर तो पुन्हा रेल्वेत चढत असतानाच हात निसटल्याने तो रेल्वेखाली सापडला.
Scene from the tragic incident in Miraj, where a young man died after falling under a train while trying to board."Sakal
मिरज : उलटी आली म्हणून रेल्वेतून खाली उतरलेल्या तरुणाचा परत रेल्वेत चढत असताना हात निसटल्याने रेल्वे चाकाखाली सापडल्याने मृत्यू झाला. लालाराम खोलबहरा विश्वकर्मा (वय ३३, बस्तीपुराणा, पौडी, नवागड, छत्तीसगड) असे मृताचे नाव आहे.