Crime
‘शेळ्या-मेंढ्या चोरट्यांना आम्ही दोनवेळा पकडून दिलं. तुम्ही दोन्हीवेळा त्यास्नी सोडून दिलं. पुन्हा चोऱ्या सुरू झाल्या आहेत. आम्ही आमच्या जितराबाचं रक्षण करतो, मातूर चुकून आमच्या हातनं काही वंगाळ घडलं तर साहेब आम्हाला दोष देऊ नका’, असा इशारा मिरज पूर्व भागातील मेंढपाळांनी पोलिसांना दिला आहे. एका रात्रीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने ते वैतागले आहेत.