
MLA Babasaheb Deshmukh
Sakal
सांगोला : सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांची कामे सुकर व्हावीत तसेच महसूल कर्मचार्यांना काम करताना अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी सांगोला विधानसभा मतदारसंघातील गावांमध्ये ७ मंडल अधिकारी कार्यालये आणि ३२ तलाठी कार्यालये उभारण्यासाठी निधी मिळावा, अशी मागणी आमदार भाई डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे.