सांगलीत वारांगणांना जगण्याचा थोडासा आधार, आमदार गाडगीळांकडून "सकाळ'च्या वृत्ताची दखल 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 16 August 2020

येथील वारांगणांचे जगणे कोरोना संकटाने अत्यंत खडतर बनलेले असताना त्याच्या जगण्याला थोडासा आधार देण्याचा प्रयत्न स्वातंत्र्यदिनी करण्यात आला. आमदार सुधीर गाडगीळ, पीएनजी सराफ पेठी, सराफ कट्टा गणेशोत्सव मंडळ आणि भाजप युवा मोर्चातर्फे त्यांना कीटचे वाटप करण्यात आले.

सांगली ः येथील वारांगणांचे जगणे कोरोना संकटाने अत्यंत खडतर बनलेले असताना त्याच्या जगण्याला थोडासा आधार देण्याचा प्रयत्न स्वातंत्र्यदिनी करण्यात आला. आमदार सुधीर गाडगीळ, पीएनजी सराफ पेठी, सराफ कट्टा गणेशोत्सव मंडळ आणि भाजप युवा मोर्चातर्फे त्यांना कीटचे वाटप करण्यात आले. सुंदरनगर, गोकूळनगर, राजमाने चाळ येथे ही मदत देण्यात आली. 

"सकाळ'ने कोरोना संकट काळात येथील वारांगणाचे होणारे हाल जनतेसमोर आणले होते. एडस्‌पेक्षाही कोरोनाची भिती जास्त वाटते, हे वृत्त प्रसिद्ध झाले आणि एकूण परिस्थितीचा आढावा घेणारा एक लाईव्ह रिपोर्ट इ-सकाळवर प्रसिद्ध झाला होता. त्याची दखल आमदार गाडगीळ यांनी घेतली. या महिलांसाठी काय करता येईल, यावर बराच काळ चर्चा झाली. त्यानंतर काल जीवनावश्‍यक वस्तूंचे कीट प्रदान करण्यात आले. 

यावेळी महापौर गीताताई सुतार, महाराष्ट्र भाजपा अल्पसंख्यांक उपाध्यक्ष मुन्ना कुरणे, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष दिपक माने, नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, नगरसेविका अनारकली कुरणे, भाजपाच्या महिला पदाधिकारी गीता पवार, मकरंद म्हामुलकर, अतुल माने, महिला बालविकास विभागाच्या कार्यालय प्रमुख दीपिका बोराडे, सामाजिक कार्यकर्ते जमीर कुरणे, प्रफुल्ल ठोकळे, सूरज पवार, सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण, गणपती साळुंखे, धनेश कातगडे, विश्वजीत पाटील, राहुल माने, प्रथमेष वैद्य, अनिकेत बेळगाव, कुष्णा राठोड ,शांतिनाथ कर्वे, अनिकेत खिलारे, सोहम जोशी ,सोहम जोशी, चेतन माडगूळकर, शुभम माने , श्रीराम चव्हाण,संरक्षण अधिकारी शिवनेरी केदार आदी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA gadgil helps to sex workers in sangli