जत : राज्यकर्त्यांनी जत तालुक्यावर जो जाणीवपूर्वक अन्याय केला, तो कायमचा संपवायचा आहे. सर्वांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पाठीशी खंबीर राहावे. महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर जतवर जो अन्याय झाला, तो पाच वर्षांत संपुष्टात निघेल, यात शंका नाही. पुढील २०२९ च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत जत तालुका नंदनवन करणार,’’ अशी ग्वाही आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी दिली.