
आटपाडी : देवाभाऊ हे गरिबांचे नेते आहेत. कारखानदार आणि चोरांना गटुळं उचलून देणारे नाहीत. ते माणगंगा कारखान्यात तीनशे कोटींचा भ्रष्टाचार करण्यासाठी नक्की मदत करणार नाहीत. याचा खरा मोरक्या जयंत पाटील आहेत, मात्र आम्ही कोणत्याही परिस्थितीत कारखाना खासगी होऊ देणार नाही. त्यासाठी बँकेत घुसून ठोकाठोकी करू, वेळप्रसंगी तुरुंगात जाऊ, अशी टोकाची भूमिका घेण्याचा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला.