माळढोक प्रश्‍न आमदार पवारांनी हाती घेतला 

MLA Pawar took up the Madhok issue
MLA Pawar took up the Madhok issue

कर्जत : तालुक्‍यातील माळढोक अभयारण्याच्या इकोसेन्सिटिव्ह झोनचे अंतर कमी करण्याबरोबरच त्यावरील निर्बंध शिथिल करण्यात यावेत, या मागणीचे पत्र आमदार रोहित पवार 
यांनी नागपूर येथे मंगळवारी प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर यांना दिले. 
तालुक्‍यातील इकोसेन्सिटिव्ह झोनच्या प्रश्नांबाबत प्रधान मुख्य वनसंरक्षक काकोडकर यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले. 

इकोसेन्सिटिव्ह झोनमध्ये निर्बंध 
याबाबत "सकाळ'शी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले, की पर्यावरणाचा विकास हा महत्त्वाचा विषय आहे. मात्र, वृक्षतोड होऊ न देता विकासकामे करायला हवीत. कर्जत तालुक्‍यामध्ये माळढोक अभयारण्य इकोसेन्सिटिव्ह झोनमध्ये 10 किलोमीटरमध्ये विकासकामे करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. अशा निर्बंधामुळे रस्तांसारखे मूलभूत प्रश्‍न, तर उद्योगनिर्मितीचे महत्त्वाचे प्रश्‍न सोडवण्यास अडचण ठरत असल्याची लोकांची मागणी आहे. 

चर्चा सकारात्मक 
अनेक वर्ष प्रलंबित असणारा हा प्रश्‍न सोडविण्यासाठी दिल्लीमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली आहे. तसेच पर्यावरणास नुकसान होऊ न देता सकारात्मक निर्णय घेऊन इकोसेन्सिटिव्हचे अंतर कमी करण्याबरोबरच वन विभागाच्या हद्दीतून 
ग्रामस्थांना रस्ते, वनपरिक्षेत्रातील गावांचे ग्रामविकास आराखडे, वन विभागाच्या विविध योजनांसाठी प्रलंबित निधी, तसेच तुकाई चारीच्या कामाकरिता वन विभागाच्या हद्दीतील क्षेत्राच्या 
प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घेण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे. 

प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर, तसेच मुख्य वनसंरक्षक जी. साईप्रकाश (बजेट प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट) यांच्या चर्चेतून सकारात्मक मार्ग निघून कर्जत तालुक्‍यातील विकासकामांना गती मिळेल. याबाबत आशा पल्लवीत झाल्या असून, आपण नियमित पाठपुरावा करणार असल्याचे आमदार पवार यांनी स्पष्ट केले. 

विकासकामांना गती मिळण्यासाठी प्रयत्न 
तालुक्‍यात माळढोक अभयारण्यातून खासगी क्षेत्र वगळले असले, तरी शासकीय क्षेत्रावर आरक्षण कायम आहे. मात्र, त्या दहा किलोमीटर अंतरामध्ये विहीर खोदाईसह अनेक निर्बंध आहे. ते अंतर कमी होत निर्बंध शिथिल झाले, तर तालुक्‍यात एमआयडीसीसह अनेक प्रकल्पांना चालना मिळत विकासकामांना गती मिळेल. यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील. 
- रोहित पवार, आमदार  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com