आमदार सदाभाऊ खोत यांच्याकडून कोविड उपचार केंद्राचा पंचनामा...रूग्णांशी सुरू असलेला खेळ न थांबल्यास 30 रोजी आंदोलन 

शांताराम पाटील 
Thursday, 24 September 2020

इस्लामपूर (सांगली)- वाळवा तालुक्‍यात कोविड उपचार रुग्णालयात रूग्णांकडे दुर्लक्ष केले जात आहे. शासनाने ताब्यात घेतलेल्या रुग्णालयात कोणाचा कोणाला पायपोस राहिला नसून लाखो रुपयांची बिले आकारण्यात येतात. रुग्णांवर उपचारासाठी अनुभवी डॉक्‍टर नसल्याबद्दल आमदार सदाभाऊ खोत यांनी "पीपीए' कीट घालून भेट देत पंचनामा केला. त्यानंतर पत्रकार बैठकीत अनुभव कथन केला. रुग्णालयात सुरू असलेला खेळ न थांबल्यास 30 सप्टेंबरला रयत क्रांती संघटना येथील प्रांताधिकारी कार्यालय व संबधित रूग्णालयासमोर आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. 

ते म्हणाले, ""कोविड आजाराचा विळखा ग्रामीण भागात पसरला आहे. ऑक्‍सीजन बेड अभावी रूग्ण तडफडून मरत आहेत. काल इस्लामपूरात बेड मिळेल का म्हणून फोन केला असता नकार मिळाला. तेथे दाखल रुग्णाला फोन केल्यानंतर बरेच बेड शिल्लक असल्याचे समजले. मग तालुका वैद्यकीय अधिकारी व बीडीओना बरोबर घेऊन संबंधित रुग्णालयात पाहणी केली असता, तिथे कोणीही "एमबीबीएस' अथवा वरिष्ठ डॉक्‍टर उपलब्ध नव्हते. बीएएमएस डॉक्‍टर हॉस्पीटल सांभाळताना दिसले. तसेच 40 बेडची क्षमता असताना फक्त 14 रुग्ण उपचार घेताना दिसले. प्रचंड दुर्लक्ष होते. हॉस्पिटल आरक्षित केल्यामुळे डॉक्‍टरांनी दुसरीकडे हे कोविड सेंटर चालू करून शासनाची फसवणूक केल्याचे दिसले. उपजिल्हा रुग्णालयात सुद्धा मुख्य डॉक्‍टर अथवा पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध नव्हता. सगळीकडेच सावळागोंधळ दिसून येतो.'' 

ते म्हणाले, ""वाळवा तालुक्‍यात 4 हजार रुग्ण व 20 व्हेंटिलेटर असे प्रमाण असेल तर मृत रुग्णांची संख्या जगात एक नंबरला जाणार नाही का ? जिल्ह्यात ऑक्‍सीजन निर्मिती कारखाना तात्काळ उभारावा. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात ऑक्‍सीजनचे 10 बेड कोविडसाठी करावेत. शासनाने कोल्हापूर जिल्ह्याप्रमाणे रेमडिसिव्हर इंजेक्‍शन व औषधे मोफत उपलब्ध द्यावीत. ज्यांचे दवाखाने आरक्षित असतील त्यांनी स्वत:कडील व्हेंटिलेटर वापरावेत. भरारी पथकाने सर्व दवाखान्याची तपासणी करून हलगर्जी करणाऱ्या डॉकटर व रुग्णालयावर कारवाई करावी'' 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Sadabhau Khot's Punchnama for Kovid Treatment Center