
सलगर बुद्रुक : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रात मंगळवेढा तालुक्यातील 19 गावांचा समावेश आहे या 19 गावांना 1.27 टीएमसी पाणी मंजूर आहे.पण दुर्दैवाने फक्त. 25 टीएमसी एवढेच पाणी माझ्या मंगळवेढा तालुक्यातील 19 गावातील शेतकऱ्यांना मिळत आहे. बाकी उर्वरित एक टीएमसी पाणी कुठे जाते याचा मी तपास काढला असून ते एक टीएमसी पाणी माझ्या मतदारसंघातील 19 गावांना दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही असे मत आमदार समाधान दादा अवताडे यांनी मांडले.ते आज सलगर बुद्रुक येथे रेनबो इंग्लिश मीडियम स्कूलच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.