esakal | सतेज पाटील यांचे काय ठरलंय कळणार संवाद मेळाव्यात
sakal

बोलून बातमी शोधा

सतेज पाटील यांचे काय ठरलंय कळणार संवाद मेळाव्यात

कोल्हापूर -  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील गटाच्या कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा पाच सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता आयोजित केला आहे. या मेळाव्यात श्री. पाटील निवडणूकीबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार आहेत. 

सतेज पाटील यांचे काय ठरलंय कळणार संवाद मेळाव्यात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर -  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील गटाच्या कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा पाच सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता आयोजित केला आहे. या मेळाव्यात श्री. पाटील निवडणूकीबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार आहेत. 

ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्क येथे हा मेळावा होणार आहे. याबाबतचे पत्रक उपमहापौर भूपाल शेटे, स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, गोकुळचे माजी संचालक बाबासाहेब चौगले, करवीरचे उपसभापती सागर पाटील, शशिकांत खोत यांनी दिले आहे.

या पत्रकात म्हटले आहे की, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी कोल्हापूर दौऱ्यावेळी विधानपरिषद आमदारांना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न देण्याबाबत काँग्रेस पक्षात विचार सुरू असल्याचे म्हटले होते. विधानपरिषदेत पक्षाला आपले संख्याबळ कायम ठेवायचे आहे, असेही त्यांनी  सांगितले होते. त्यामुळे कोल्हापूर दक्षिण आणि कोल्हापूर उत्तरच्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीबद्दल चर्चा सुरू झाली आहे.  

आमदार पाटील यांनी आजपर्यंतचे सर्व राजकीय निर्णय कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन घेतले आहेत. त्यामुळे विधानसभानिवडणुकीसंदर्भातसुद्धा कार्यकर्त्यांशी संवाद साधून निर्णय घ्यायचे आमदार सतेज पाटील यांनी ठरविले आहे. त्यासाठीच हा संवाद मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात कार्यकर्त्यांची मते ऐकून घेऊन पुढील दिशा ठरवली जाणार आहे. या मेळाव्याला कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे .

loading image
go to top