esakal | आमदार सुधीर गाडगीळ व पत्नी कोरोना "पॉझिटीव्ह' 
sakal

बोलून बातमी शोधा

sudheer gadgil.jpg

सांगली- येथील भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ आणि त्यांच्या पत्नी यांचा "कोरोना' तपासणी अहवाल "पॉझिटीव्ह' आला आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत असून राजकीय मंडळींना देखील कोरोनाची लागण होत आहे. 

आमदार सुधीर गाडगीळ व पत्नी कोरोना "पॉझिटीव्ह' 

sakal_logo
By
घनश्‍याम नवाथे

सांगली- येथील भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ आणि त्यांच्या पत्नी यांचा "कोरोना' तपासणी अहवाल "पॉझिटीव्ह' आला आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत असून राजकीय मंडळींना देखील कोरोनाची लागण होत आहे. 

काही दिवसापूर्वी मिरजेतील आमदार सुरेश खाडे हे कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले होते. त्या पाठोपाठ सांगलीतील कॉंग्रेस नेत्या जयश्री पाटील, माजी आमदार संभाजी पवार, कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील हे देखील कोरोना बाधित झाले आहेत. कॉंग्रेसचे नगरसेवक मंगेश चव्हाण हे नुकतेच कोरोनामुक्त झाले आहेत. त्याचबरोबर काही नगरसेवकही बाधित झाले आहेत. 
सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांना नुकतेच त्रास होऊ लागल्यामुळे त्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्यामध्ये ते आणि त्यांच्या पत्नी यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यांना होम आयसोलेशन करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात आले. 

दरम्यान जिल्ह्यात बुधवारी (ता.19) 331 कोरोना बाधित रूग्ण आढळले होते. जिल्ह्यातील एकुण बाधित रूग्णांची संख्या 7400 हून अधिक झाली आहे. तर महापालिका क्षेत्रातील बाधितांची संख्या 4446 हून अधिक आहे. सध्या रूग्णालयात उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या 3038 इतकी आहे. त्यापैकी 337 रूग्ण चिंताजनक आहेत. तर होम आयसोलेशन रूग्णांची संख्या 1420 इतकी आहे. 
 

loading image
go to top