चंद्रकांतदादा है, तो मुमकिन है !; यांनी उधळली स्तुतीसुमने

अजित झळके
Sunday, 8 September 2019

सांगली - सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी आज चंद्रकांतदादांसाठी नवे बिरुद तयार केले. देशात जसे "मोदी है तो मुमकिन है' म्हणतात, तसे आमच्यासाठी "चंद्रकांतदादा है, तो मुमकीन है', अशा शब्दांत त्यांनी महसूलमंत्र्यांना सहकार्याबद्दल धन्यवाद दिले. 

सांगली - सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी आज चंद्रकांतदादांसाठी नवे बिरुद तयार केले. देशात जसे "मोदी है तो मुमकिन है' म्हणतात, तसे आमच्यासाठी "चंद्रकांतदादा है, तो मुमकीन है', अशा शब्दांत त्यांनी महसूलमंत्र्यांना सहकार्याबद्दल धन्यवाद दिले. 

सार्वजनिक बांधकाम मंत्रीही असलेल्या चंद्रकांतदादांच्या सहकार्यामुळे आमदार गाडगीळ यांना सांगलीकरांचे विश्रामबाग उड्डाणपुलाचे स्वप्न साकार करता आले. त्या पुलाचा लोकार्पण सोहळा आज झाला. अगदी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा पूल वाहतूकीसाठी खुला झाला आणि सांगलीकरांनी तेथे सेल्फी घेत या नव्या पुलाबद्दल आनंदही व्यक्त केला. 
त्यानंतर झालेल्या भाजप बुथ कमिटी मेळाव्यात सुधीर गाडगीळ यांनी गेल्या पाच वर्षात तब्बल एक हजार कोटी रुपयांचा निधी आणल्याचे सांगितले. त्यात विशेषतः रस्ते, पूल यांचा समावेश असून चंद्रकांतदादांनी कोणताच शब्द खाली पडू दिला नाही. शंभर टक्के सहकार्य केले. त्यामुळेच हे शक्‍य झाले, असे गौरवोद्‌गार काढले.

मी राजकारणात नवा होतो, त्या काळात खासदार संजयकाका पाटील, माजी आमदार दिनकरतात्या पाटील, प्रदेश उपाध्यक्ष झालेले शेखर इनामदार यांनी सहकार्य केल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली. पुढील पाच वर्षात या साऱ्यांच्या पाठबळावर सांगली मतदार संघ मागणीमुक्त करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी जाहीर केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Sudhir Gadgil comment on Chandrakantdada Patil