Bhaktipeeth Highway : पंढरपूर ते कोकण भक्तिपीठ महामार्ग करा; आमदार सुहास बाबर यांची सरकारकडे मागणी

MLA Suhas Babar : राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी शक्तिपीठ महामार्ग प्रकल्प मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला आहे. या शक्तिपीठ महामार्गाबाबत राज्यातील मतमतांतरे काही सदस्यांनी अधिवेशनात व्यक्त केली.
Pandharpur to Kokan Bhaktipeeth Highway
Pandharpur to Kokan Bhaktipeeth Highwayesakal
Updated on
Summary

विटा शहरापासून महाराष्ट्रातील दत्तभक्तांचे श्रध्दास्थान असणारे विटा- औदुंबरमार्गे इस्लामपूर आणि त्याच मार्गाने आपण कोकणात उतरू शकतो.

विटा : सांगली-कोल्हापूर परिसरात शासनाने शक्तिपीठ महामार्गाचा (Shaktipeeth Highway) जो मार्ग आखला आहे, त्याला काही ठिकाणी विरोध होत असताना आमदार सुहास बाबर (MLA Suhas Babar) यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्प २०२५ विधिमंडळ अधिवेशनात या महामार्गात पंढरपूर ते कोकण भक्तिपीठ महामार्ग (Pandharpur to Kokan Bhaktipeeth Highway) करा, असा बदल करावा, अशी विनंती विधिमंडळ अध्यक्षांमार्फत सरकारकडे केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com