

Sangli Tree Army Initiative
ESakal
सांगली : सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात एका आगळ्यावेगळ्या प्रकारच्या लष्करी शिस्तीचा हरित उठाव सुरु आहे अवघ्या सांगली जिल्ह्यात या अनोख्या उपक्रमाचा गवगवा पाहायला मिळतोय. जिल्ह्यातील तरुण आमदार सुहास बाबर यांच्या पुढाकारातून या हरित क्रांतीचं नेतृत्त्व पाहायला मिळत आहे. आडनिड्या ठिकाणी वाढलेलं पिंपळाचं झाड, तोडू नये त्याऐवजी त्याची पुनर्स्थापना करावी म्हणून सुरु झालेला प्रवास आता हजारो सांगलीकरांचा सहभाग असलेल्या ट्री आर्मीपर्यंत येऊन ठेपला आहे असं आमदार सुहास बाबर यांनी सांगितलं.