काँग्रेसला उमेदवारी डावलल्यास 2009 प्रमाणं 'जत पॅटर्न' राबवू; बड्या नेत्याचा स्पष्ट इशारा, नेमका काय आहे जत पॅटर्न?

सांगली पुन्हा जिंकण्याच्या इराद्याने आम्ही तयारी केली आहे.
MLA Vikram Sawant Warning to Congress
MLA Vikram Sawant Warning to Congress esakal
Summary

‘२०१९ ला जी चूक झाली त्याची पुनरावृत्ती यावेळी होणार नाही. सांगलीतून काँग्रेसच लढेल. ऐनवेळी अन्य पक्षाला उमेदवारी द्यायची, उमेदवार आयात करायचा, हे धोरण चालणार नाही.'

सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघातून (Sangli Loksabha Constituency) काँग्रेसच (Congress) लढेल. विशाल पाटील आमचे उमेदवार आणि पुढचे खासदार असतील. उमेदवारी डावलण्याचा प्रयत्न केला तर मात्र २००९ ला जतमध्ये जो पॅटर्न राबवला त्याची पुनरावृत्ती होईल, असे आम्ही वरिष्ठ नेत्यांना कळवले आहे, अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, आमदार विक्रम सावंत (Vikram Sawant) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

काँग्रेसची काल महत्त्वाची बैठक काँग्रेस भवनमध्ये झाली. त्यामध्ये नवीन पदाधिकारी निवडी जाहीर करण्यात आल्या. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘पदाधिकारी निवडीच्या बैठकीत आज लोकसभा निवडणूक (Loksabha Election) ताकदीने लढवण्याचा निर्णय झाला. नवीन सहा उपाध्यक्ष, चार सरचिटणीस व एक सदस्याची निवड जाहीर केली आहे. पक्ष बांधणी मजबूत होत आहे. सांगली पुन्हा जिंकण्याच्या इराद्याने आम्ही तयारी केली आहे.

MLA Vikram Sawant Warning to Congress
Loksabha Election : लोकसभेसाठी उदयनराजेंना BJP कडून तिकीट मिळणार की नाही? चित्रा वाघ यांनी मनातलं स्पष्टच बोलून दाखवलं..

विशाल पाटील (Vishal Patil) आमचे उमेदवार असतील, असे एकमुखी कळवले आहे. त्यावर प्रदेश नेत्यांसोबत सगळा उहापोह झाला आहे. सांगली हा हक्काचा मतदारसंघ असून तो कदापि सोडणार नाही, असे आम्ही स्पष्ट सांगितले आहे.’ या बैठकीला माजी आमदार मोहनराव कदम, युवा नेते डॉ. जितेश कदम, प्रा. शिकंदर जमादार, सुभाष खोत, बाबासाहेब कोडग, संजय हजारे, अमित पारेकर, जयदीप पाटील, सचिन चव्हाण आदी उपस्थित होते.

MLA Vikram Sawant Warning to Congress
देशाला कायमचं कर्जात बुडवून मोदी एक दिवस संन्यासाला जातील; भाजप, काँग्रेससह पंतप्रधानांवर आंबेडकरांची सडकून टीका

आयात नको

विक्रम सावंत म्हणाले, ‘२०१९ ला जी चूक झाली त्याची पुनरावृत्ती यावेळी होणार नाही. सांगलीतून काँग्रेसच लढेल. ऐनवेळी अन्य पक्षाला उमेदवारी द्यायची, उमेदवार आयात करायचा, हे धोरण चालणार नाही. आम्ही ते सहन करणार नाही. अर्थात, ती वेळच येणार नसल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधिमंडळ गटतेने बाळासाहेब थोरात यांनी आम्हाला आश्‍वस्त केले आहे.’

काय होता ‘जत पॅटर्न’

२००९ साली काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत जत विधानसभा मतदारसंघ ऐनवेळी राष्ट्रवादीला देण्याचा निर्णय झाला. तो काँग्रेसचा मतदारसंघ होता. राष्ट्रवादीने विलासराव जगताप यांना उमेदवारी दिली. जगताप यांच्याशी काँग्रेस नेत्यांचा जुना संघर्ष. त्यातून जत तालुका काँग्रेस कमिटी बरखास्त करण्याचा निर्णय घेतला गेला. त्या संधीचा फायदा भाजपने उचलला. भाजपने प्रकाश शेंडगे हे आयात उमेदवार दिले. काँग्रेस नेत्यांनी शेंडगेंचा प्रचार केला आणि जगतापांना पराभवाचा धक्का दिला.

MLA Vikram Sawant Warning to Congress
आमचं काम पाहून विरोधकांच्या पोटात दुखतंय, त्यामुळं ते शिव्याशाप देताहेत; मुख्यमंत्री शिंदेंचा जोरदार निशाणा

नूतन पदाधिकारी असे-

वरिष्ठ उपाध्यक्ष- प्रा. शिकंदर जमादार (कसबे डिग्रज), उपाध्यक्ष आनंदराव रासकर (कडेगाव), संदीप जाधव (येलूर), संभाजी पाटील (बेडग), नंदकुमार शेळके (वाळवा), शिवाजी मोहिते (हरिपूर), खजिनदार - सुभाष खोत (कानडवाडी), सरचिटणीस- मिलिंद डाके, अण्णाराव पाटील (सनमडी), सदाशिव खाडे (कवलापूर), सदस्य शेखर तवटे (एरंडोली).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com