
चिंचणीच्या अगरबत्तीचा 'दरवळ' राज्याबाहेर
देवराष्ट्रे - कुटुंबातील सदस्य म्हणून वावरताना अनेकदा खचून जाण्याचे प्रसंग आले. गरिबीला तोंड देताना काहीतरी करण्याची जिद्द मनात ठेवून त्यांनी स्वतःला उभारले. परिस्थिती बदलायची तर भक्कम व्हावेच लागेल, याच आत्मविश्वासातून अगरबत्तीच्या व्यवसायातून संसार उभारला. मोहिनी कदम यांची ही यशोगाथा आहे. चिंचणी (ता. कडेगाव) येथील कदम यांनी अगरबत्ती व्यवसाय सुरू केला व आता मोहिनी अगरबत्तीचा दरवळ राज्याबाहेर पसरला आहे. त्यातून चांगले उत्पन्न मिळवित आहेत.
काळ कठीण होता. काहीच काम नव्हते. च्यध मोहिनी व त्यांचे पती फिरत होते. मोहिनी यांना सामाजिक कार्याची आवड होती. त्यातूनच कमी पैशांत अगरबत्तीचा व्यवसाय सुरू होऊ शकतो, असे त्यांना मैत्रिणीकडून समजले. अगरबत्ती मशिन घेण्यासाठी पैसे नव्हते. मग सुरवातीला मोहिनी व त्याचे पती घरोघरी जाऊन अगरबत्ती विक्री करू लागले. नफाही मिळू लागला आहे. वर्षांनंतर अगरबत्ती मशिन घेण्याचा निर्णय घेतला.
कर्ज घेऊन साधी अगरबत्तीची मशिन घेतली. चांगल्या दर्जाची मशिन घ्यायची होती. पण कर्ज तेवढे मिळाले नाही. कोणतेही काम मनापासून केले की यश मिळतेच. मोहिनी व त्याचे पती विजय पंधरा तास काम करीत. त्यातून त्यांनी कर्ज फेडले. नवीन चांगल्या दर्जाच्या दोन मशिन घेतल्या. त्यातून वेगळा अगरबत्ती ब्रँड तयार करायचा निर्धार केला. तुळसीचा सुगंध यावा, अशी अगरबत्ती तयार केली. मोहिनी अगरबत्ती नाव द्यायचा निर्णय विजय यांनी घेतला. मोहिनी अगरबत्ती लोकांच्या पसंतीस उतरली. ही अगरबत्ती राज्यात सर्वत्र व राज्याबाहेरही मागितली जाऊ लागली.
अगरबत्तीसाठी व्यापारी अगाऊ नोंदणी
कष्ट करायची तयारी असली की सर्व गोष्टी साध्य होतात. अगरबत्ती व्यवसायात आज भरारी घेतली आहे. पती व मी दोघांनी खूप कष्ट घेतले आहेत. एकेकाळी हलाखीची स्थिती होती. आज चांगली म्हणता येईल, अशी स्थिती आहे.
- मोहिनी कदम.
Web Title: Mohini Kadams Agarbatti Business Success Story Chinchani Kadegaon Sangli
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..