
सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये ६८ सदस्य आहेत. त्यामध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. त्यात राष्ट्रवादीला २३ व काँग्रेसला सात जागा मिळाल्या होत्या. सर्वात जास्त जागा असतानाही राष्ट्रवादीला दोन्हीही वेळी अध्यक्ष करता आला नाही. सुरुवातीला अपक्ष निवडून आलेले सदस्य संजय शिंदे यांनी यशस्वी खेळी करून अध्यक्षपद पदरी पाडले होते.
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आपल्याच समर्थकाला मिळावे म्हणून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी प्रयत्न केले होते. त्यातूनच त्यांनी शिवसेनेचे प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही चर्चा केली होती, अशी चर्चा येथे रंगली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेची निवडणूक २०१७ मध्ये झाली होती. येथील अध्यक्षाचा कार्यकाल संपल्यानंतर अध्यक्षपदासाठी मंगळवारी निवडणूक झाली. त्यात करमाळा तालुक्यातील केम जिल्हा परिषदेच्या गटातील अनिरुद्ध कांबळे यांची भाजपच्या पाठिंब्याने अध्यक्ष म्हणून निवड झाली. कांबळे यांना अध्यक्ष करण्यात मोहिते पाटील व माजी आमदार नारायण पाटील यांचे समर्थक अजित तळेकर यांचा मोठा वाटा आहे.
हेही वाचा : फडणवीसांची कर्जपाफी किचकट तर ठाकरेंची सुटसुटीत
यांनीही कांबळेंने केले मतदान...
सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये ६८ सदस्य आहेत. त्यामध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. त्यात राष्ट्रवादीला २३ व काँग्रेसला सात जागा मिळाल्या होत्या. सर्वात जास्त जागा असतानाही राष्ट्रवादीला दोन्हीही वेळी अध्यक्ष करता आला नाही. सुरुवातीला अपक्ष निवडून आलेले सदस्य संजय शिंदे यांनी यशस्वी खेळी करून अध्यक्षपद पदरी पाडले होते. आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र येऊन आपलाच अध्यक्ष करील अशी शक्यता होती. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. भाजपसह समाधान आवताडे, आमदार प्रशांत परिचारक व राजेंद्र राऊत यांच्या समर्थ जिल्हा परिषद सदस्यांनी कांबळे यांना मतदान करुन अध्यक्ष निवडीत विजयी केले आणि सर्वात जास्त जागा असणाऱ्या राष्ट्रवादीला सत्तास्थापनेपासून रोखले.
हेही वाचा : सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री भरणे?
तर तुम्हाल दुसरे पद नाही
कांबळे यांना अध्यक्ष करण्याबाबत मोहिते पाटील यांनी अजित तळेकर यांच्याशी चर्चा केली होती. त्यात ‘तुम्हाला आता अध्यक्षपद दिले तर पुन्हा लवकर दुसरे मोठे पद मिळणार नाही’ असे मोहिते पाटील यांनी तळेकर यांना सांगितले होते, अशी विश्वासनीय सुत्राने ‘सकाळ’ला सांगितले आहे. त्यानुसार कांबळे यांनी होकार दिला आणि करमाळ्याला अध्यक्षपद देण्याचा मोहिते पाटील यांनी निर्णय घेतला. मोहिते पाटील यांनी तळेकर व माजी आमदार नारायण पाटील यांनी सुचवलेल्या व्यक्तीला अध्यक्ष करता यावे म्हणून शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली होती, अशी चर्चा आहे. कारण शिवेसेनेचे जिल्हा परिषदेत पाच सदस्य आहेत. त्यात करमाळा तालुक्यात माजी आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडून आलेले चार सदस्य आहेत. त्यांच्या मदतीशीवाय अध्यक्ष करणे अशक्य होते.
हेही वाचा : भाजपचा ‘कटोरा’ भरणार?
मी राष्ट्रवादीतच...
जिल्ह्याच्या राजकारणात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व बबनराव शिंदे यांच्यात वर्चस्वासाठी नेहमीच संघर्ष राहिला आहे. झेडपीच्या निवडणुकीवेळी हे दोघेही राष्ट्रवादीकडूनच होते. मात्र लोकसभा निवडणुकीपासून मोहिते-पाटील यांनी भाजपशी जवळीक वाढवली आहे. माजी खासदार रणजितसिंह मोहिते- पाटील यांनी तर भाजपमध्ये प्रवेशच केलेला आहे. मात्र, विजयसिंह मोहिते- पाटीलही तेव्हापासूनच भाजपच्या वाटेवर आहेत. फक्त त्यांनी अधिकृत प्रवेश केलेला नाही.
पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी आपण राष्ट्रवादीत असल्याचेही वक्तव्य केले होते.
काँग्रेसच्या सात, शिवसेनेच्या पाच जागा
माळशिरस तालुक्यातील ११ पैकी आठ जागा राष्ट्रवादीकडे आहेत. मात्र, त्यातील बहुतांश सदस्य मोहिते-पाटील यांना मानणारे आहेत. माढ्यात बबनराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने सात जागा मिळवल्या होत्या. सांगोला तालुक्यात शेकापचे गणपतराव देशमुख व दीपक साळुंखे यांनी सातपैकी पाच जागा जिंकत शिवसेनेला रोखले होते. पंढरपूर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या आठ जागांपैकी पैकी सात जागा परिचारक गटाने जिंकल्या. येथे काँग्रेसला एकही जागा नाही. अक्कलकोटमध्ये सहापैकी काँग्रेसने तीन जागा मिळवल्या. मंगळवेढा तालुक्यात शिवसेना पुरस्कृत समाधान अवताडे गटाला चारपैकी तीन जागा मिळाल्या होत्या.
पक्षीय बलाबल
राष्ट्रवादी : २३
भाजप : १४
काँग्रेस : ७
शिवसेना : ५
स्थानिक आघाड्या : १६
अपक्ष : ३