
मोहोळ : शेतात विक्रीसाठी साठवून ठेवलेली एक लाख 40 हजार रुपयाची सुगंधी तंबाखूची 200 पाकिटे मोहोळ पोलीस व अन्नसुरक्षा विभागाने जप्त केली असून, या संदर्भात एक जणावर गुन्हा दाखल झाला आहे. दिगंबर बाळासाहेब कोळी वय 38 रा गुरुनगर सौंदणे ता मोहोळ असे गुन्हा दाखल झालेल्या चे नाव आहे. ही घटना सौंदणे येथील समाधान भीमराव दहिवडे यांचे शेतात शुक्रवार ता 13 रोजी घडली.