Ganesh Festival 2025
Sakal
पश्चिम महाराष्ट्र
Ganesh Festival 2025 : डॉल्बी मुक्त सोलापूर उपक्रमात मोहोळ तालुका वरच्या क्रमांकावर, गणेश विसर्जन शांततेत निर्माल्याचे होणार कंपोस्ट खत
Mohol Ganeshotsav : मोहोळ तालुक्यात इतिहासात प्रथमच "डॉल्बीमुक्त" गणेशोत्सव शांततेत पार पडला; पारंपरिक वाद्यांचा गजर आणि समाजाचा सलोखा याचे उत्तम उदाहरण!
मोहोळ : कुठलाही अनुचित प्रकार न घडता मोहोळ तालुक्यात गणेशोत्सव व गणेश विसर्जन शांततेत पार पडले. मोहोळ तालुक्यात प्रथमच गेल्या अनेक वर्षाच्या इतिहासात प्रथमच "डॉल्ब मुक्त" गणेशोत्सव पार पडला. याचे सर्व थरातून अभिनंदन होत आहे. त्यामुळे "डॉल्बीमुक्त सोलापूर" या उपक्रमात मोहोळ तालुका वरच्या क्रमांका वर आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

