सांगली : मॉन्सूनपूर्व (Monsoon Rain) पावसाने आठ दिवस पाणी पाणी केल्याने टेंभू, ताकारी, म्हैसाळ उपसा सिंचन योजनांचे अनेक पंप बंद करण्यात आले आहेत. आतापर्यंत २२ टीएमसी पाणी उपसा करण्यात आला असून तूर्त योजनेवरील ताण कमी झाला आहे. जूनमध्ये पावसाची परिस्थिती कशी राहते, यावर पुढील निर्णय घेतला आहे. सध्याच्या स्थितीत विद्युत निर्मितीसाठी कोयना धरणातून अतिरिक्त चार टीएमसी पाणी वापरण्यास मान्यता देण्यात आली आहे.