काेयना नदीत चिमुरड्यांसह आईची आत्महत्या

Koyna River
Koyna River
Updated on

पाटण (जि. सातारा) : गुरुवारी (ता. 13) रात्री सांगवड पुलावरुन कोयना नदीत उडी मारुन एका विवाहितेने दोन लहान मुलांसह आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नऊ महिन्यांच्या मुलाचा मृतदेह सापडला असुन दोघांना शोधण्याचा प्रयत्न पोलिस व ग्रामस्थ करीत आहेत. राधिका मनोजकुमार माने (वय २७, राहणार म्हसवड ता. माण) असे उडी मारलेल्या महिलेचे नाव आहे. दरम्यान आत्महतेचे कारण समजु शकले नाही.

हेही वाचा -  राष्ट्रीय बास्केटबाॅल स्पर्धेत महाराष्ट्र संघाची आज उपांत्यपुर्व लढत

याबाबत घटना स्थळावरुन मिळालेली माहिती अशी : राधिका माने यांचे माहेर सांगवड असुन त्या पाच-ते सहा दिवसांपुर्वी माहेरी श्रावण (वय - तीन) व शिवराज (वय - नऊ) महिने या दोन मुलांना घेऊन आल्या होत्या. गुरवारी (ता.12) रात्री जेवण झाल्यानंतर घरातील सर्वजण झोपी गेले. सकाळी उठल्यानंतर सर्वांच्या लक्षात राधिका व तिची दोन मुले घरात नाहीत हे लक्षात आले. शेजारी चौकशी केली, पुन्हा गावात शोधाशोध केली मात्र ती सापडली नाही. दुरध्वनीवरुन पै-पाहुण्यांकडे चौकशी केली.

अवश्य वाचा - चिमुरडी उभारतेय माणुसकीची भिंत

दुपारी राधिकाचे चुलते कृष्णत काशिनाथ पाटील हे कोयना नदीकाठी गेले असता लहान मुलाचा मृतदेह नदीपात्रात तरंगत होता. कृष्णत पाटील यांनी नातेवाईकांना सांगितले व घरातील माणसांनी नदीकडे धाव घेतली. सदर मृतदेह शिवराजचा असल्याचे नातेवाईकांच्या लक्षात आले. ही बातमी गावात समजल्यानंतर नदीकाठी गर्दी झाली. पोलिसांना माहिती दिल्यानंतर मल्हारपेठ पोलिस दूरक्षेत्राचे पोलिस उपनिरिक्षक शिशिर शिंदे पोलिसांचे पथक घेऊन घटनास्थळी दाखल झाले.

अद्याप राधिका व तीन वर्षाचा श्रावण यांचा शोध लागलेला नाही. नदीपात्रात पाणी जास्त असल्याने पोहणारांना शोध मोहिम राबविण्यासाठी बोलविण्यात आले आहे मात्र अंधार पडु लागल्याने शोधमोहिम शनिवारी (ता. 14) सकाळी करावी लागणार आहे.

जरुर वाचा - नऊ दारू दुकाने, बिअर बारवर गंडांतर ; आता खाकीच्याच हातात भवितव्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com