
आष्टा : ‘‘परंपरेला छेद देत छत्रपती शिवाजी महाराजांनी राजदंड स्वतःच्या हाती ठेवला आणि दाखवून दिले की, धर्मसत्ता ही राजसत्तेच्या डोक्यावर नाही, तर धर्मसत्ता आणि राजसत्ता यांना एकत्र करून रयतेचे कल्याण करायचे असते. तो आजचा दिवस म्हणजे शिवराज्याभिषेक आणि आज राजारामबापू पाटील पतसंस्थेच्या नूतन वास्तूचा उद्घाटन सोहळा आपण घेतला, हे भाग्याचे आहे,’’ असे प्रतिपादन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आष्टा येथे राजारामबापू पाटील पतसंस्थेच्या नूतन वास्तू उद्घाटन समारंभात केले.