मिरज : अपक्ष म्हणून पहिल्यांदा निवडून आल्यानंतर जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांना मंत्रिपद मिळाले. त्यासाठी त्यांना कुठला तरी पक्ष निवडावा लागला. मी पहिल्यांदाच अपक्ष म्हणून खासदार झालो. आता भविष्यात मीदेखील काँग्रेस (Congress) किंवा अन्य कोणत्या तरी पक्षात जाईन, मग मलाही मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा विशाल पाटील (Vishal Patil) यांनी व्यक्त केली.